S
Soham Garad


मल्टिव्हर्स... हे खरं आहे का नाही माहित नाही. पण आशिष त्याने असं काही अनुभवले कि आता सर्व काही खरं आहे असं वाटू लागले. एका प्रेमाची अशी कहानी जी कधी ऐकली नसेल ना कुठे वाचली असाल. पण आता वाचा आशिषच्या प्रवासाची ही कहानी.


Aventure Tout public.

#sci-fi #love #mystery #thriller
0
1.0mille VUES
En cours - Nouveau chapitre Tous les dimanches
temps de lecture
AA Partager

कोण आहे ती?

आशिष एक ९ ते ५ काम करनारा मुलगा. तो त्याच्या मित्रांसोबत राहत होता. आर्यन आणि रघु. ते मुंबईत राहत होते आणि त्याचं आताच त्याच्या गलफ्रेंड सोबत ब्रेकप झाले होते.


एक दिवशी, ते तीघे कामात असतात, आर्यन आशिषला विचारतो,


आर्यन: भावा आजची काय सोय आहे का?


आशिष: आहे ना भाऊ.


आर्यन: बर आज रात्री टेरेसवर भेटू.


ते कामातून सुटतात आणि दारूची एक मोठी बाटली घेऊन आशिषच्या घरी जातात. ते फ्रेश होतात आणि पैयला बसतात. काही वेळाने बोलता बोलता आर्यन आशिषला विचारतो,


आर्यन: आशिष जरा तुझी लव स्टोरी सांग ना ?


आशिष: का तुला नाही माहिती का?


आर्यन: माहिती पण दारू पिल्यावर तुझी दर्द भरी

दास्तान ऐकायला मज्जा येते रे.


तिघे दारूच्या नशेत धुंद आसतात,


आशिष: बर ऐक... जिच्यावर केलं प्रेम फक्त मी,

तिचा होता आजून एक धरून मी.


आर्यन आणि रघु दोघे हसतात,


आशिष (चिडतो): म्हणून मी सांगत नाही. हसता

राव तुम्ही भावावर.


रघु: बर सॉरी...


आर्यन: भावा एक सांग..


आशिष: हा बोल.


आर्यन: तुझं तिच्यासोबत ईंटरकॉर्स झालता?


आशिष: हा झालता.


आर्यन आणि रघु पुन्हा हसतात,


आशिष: आत्ता काय?


आर्यन: भावा ती तुला सोडून नाही तुझा कापून

गेली आहे.


आशिष: मरूदे भेंचोद प्रेमात परत झक

मारनारच नाही.


आर्यन: सबास...


ते पित असतात.. काही वेळाने त्यांची दारू संमप्ते.


आर्यन: ए बाबा मी चालोय झोपायला.


आशिष: हा जा गुड नाईट.


आर्यन: का.. तु नाही येत का?


आशिष: नाही जावा तुम्ही मी आज वरच आहे.


आर्यन: बर बाबा, रघु चल आपल घरी.


काही वेळाने आशिष झोपून जातो......दुसऱ्या दिवशी...


आशिष ऊठतो. आणि टेरेस वरून त्याच्या घरात जातो. त्याला ते दोघे दिसत नाही त्याला समजत की, आर्यन आणि रघु त्यांच्या घरी निघुन गेलते. आज त्याची सुट्टी असते. आशिष दिवस भर आराम करायच ठरवतो. त्याच सगळ आवरे पर्यंत दुपार होते. मग तो दुपारच जेवतो. जेवन झाले की तो नकळत टि.व्ही. पाहता पाहता झोपून जातो. आणि जे झोपतो ते संध्याकाळी ७ वाजताच ऊठतो. ईतक झोपून त्याला दमल्या सारख वाटत होत. तो आवरून जारा बाहेर फिरायला जातो, तिथेच मित्रान मध्ये मिळतो. त्यांच्या सोबत फिरता फिरता परत येईला त्याला रात्रीचे ११ वाजतात. तो येऊन झोपायला बघतो. पण त्याला झोप येत नाही. झोप येत नसते म्हणून तो त्याच ईंस्टाग्राम बघत बसतो. तेवढयात त्याला एक मेसेज येतो तो पाहातो तर ते आर्यनचा मेसेज आसतो. पण वेगळ्या अकाउंट वरून. आशिष "हाय" मेसेज करनारच असतो तेवढयात तिथून एक मेसेज येतो...


मेसेज: हाय, मी आर्यनची गलफ्र्ंड आहे.


आशिष विचार करतो, आर्यन ईतक्या मुली फिरवतो मग ही कोणती असेल.


आशिष: आम्हच्या वहिनी. बोला की.


मेसेज: बघाना तो आर्यन माझ्याशी बोलत नाही.


आशिष: तस तुमचं नाव काय म्हणाले?


मेसेज: माझं नाव रश्मी आहे.


आशिष: बर मी सांगतो त्याला.


रश्मी: हा बरर...


आशिष लगेच स्रीनसॉट घेतो आणि आर्यनला व्हॉट्सॲप करतो.


आशिष: ही कोण आहे रे ?


आर्यन: सोड रे टाईमपास आहे आपलं.


आशिष: आरे ती माझ्या माघे लागली आहे की

तुला तिच्याशी बोलायला लाव.


आशिष खूप समजावतो त्याला मग आर्यन रश्मीला मेसेज करायला तैयार होता.

तेवढयात रश्मी आशिषला मेसेज करते,


रश्मी: तो जर नाही म्हणाला तर तुम्ही आहात का

सिंगल?


आशिष: Excuse me!


अचानक रश्मीचा मेसेज डिलीट होतो,


रश्मी: हो का नाही?


आशिष: हे बघा मॕडम मला काही ईंट्रेस्ट नाही

असल्या गोष्टीत.


रश्मी: टाईमपास तरी?


आशिष लगेच आर्यनला फोन लावतो


आशिष: आधी ब्रेकप कर. मुलगी बरी नाही वाटत.


आर्यन: हो माहिती मला पण तुझ ऐकतोय ना मी.


आशिष: बर आत्ता मी ब्रेकप कर म्हणतोय.


आर्यन: बर


काही वेळाने आर्यन ब्रेकप केल म्हणून स्रीनसॉट पाठवतो. तेवढयात आशिषला रश्मीचा मेसेज येतो


रश्मी: हे चांगल नाही केल तू. ब्रेकप केलं आम्हच

याद रख आत्ता तू.


ईतकं बोलून रश्मी आशिषला ब्लॉक करते. आशिष काय चाललय ह्या विचारात रात्र घालवतो


दुसऱ्या दिवशी...

सुमारे दुपारी १.३० वाजता आशिषला रश्मीच्या आकाउंट वरून एक मेसेज येतो.


मेसेज: हाय, मी रश्मीची मैत्रीण बोलतीए.


आशिष: हा बोला.


मेसेज: मी तुमचे फोटो पाहिले.


आशिष हैराण होऊन,


आशिष: बरर माग?


मेसेज: मला तुम्ही फार आवडले.


आशिष: काय ...?


मेसेज: हो खरच. मला आर्यनने तुमच्या बद्दल

सांगितले आहे. तुम्ही सिंगल आहात ना?


आशिष: हो आहे तर मग?


मेसेज: आपल काही होऊ शकत का?


आशिष: तुमच नाव काय आहे.?


मेसेज: नुपूर.


आशिष लगेच आर्यनला फोन लावतो


आशिष: ए तू कुठल्या मुलीला माझ्या बद्दल

सांगितले आहे?


आर्यन: तुला मेसेज आलाय का?


आशिष: हा आलाय.


आर्यन: आरे ती मुलगी खूप चांगली आहे आणि तू

पण तसाच पडलायस म्हणून म्हणल जरा

ओळख होईल.


आशिष: पण तुझ्या अकाउंट वरून मेसेज येतोय

मला.


आर्यन: हो माहिती. मीच तिला माझ्या नावाचं

अकाउंट खोलून दिलय.


आशिष: बरर मी बघतो.


ती खरच एक नुपूर नावाची मुलगी आसते. बोलता बोलता काही दिवसांत आशिष तिची माहिती काडतो. जशीकी,

एक ते दीड वर्षांसाठी ती पुण्या मध्ये आहे तिच्या आई वडिलांन सोबत. मग एक ते दीड वर्षा नंतर मुंबईला येनार होती. मेसेज, कॉल, विडीयो कॉल ह्यांच्या साहियाने आशिष नुपूर सोबत बोलायचा.


काही दिवसांनी...


आर्यन आणि आशिष आसेच पैईला बसले होते


आर्यन: मग आत्ता भावा काय... दीड वर्ष थांबनार.


आशिष: हा मग काय..थांबू की.


आर्यन: ईत्का सिरीयस आहे भाऊ तू.


आशिष: हम्म


आर्यन: मग तिची येईची वाट पाहनार का, तू पण

एकदा तिकडं जाऊन येनार.


आशिष: जानार ना मी पण तिकडं. तोवर पैसा

कमऊ ना. मग आरामात जाऊ.


मग तो वर्ष भर जोरात काम करतो. पैसे कमवतो आणि साठावतो. ईतक्या काळात नुपूर आणि आशिषच प्रेम एक दुसऱ्यां बद्दल खूप वाडलं होतं.

आशिष एक वेळ स्वताला विसरेल पण नुपूरला विसरणे आता त्याला शक्य नव्हते.


मग आत्ता एक वर्ष निघुन गेला. आशिष आत्ता सेटेल सुध्दा झालता. आणि तिथे नुपूरला तिच्या वडिलांनी लग्ना बद्दल विचारलं होत. तेव्हा नुपूर तिच्या वडिलांना आशिष बद्दल सांगते. तिचे वडील आशिषला बोलवून घे सांगतात. आणि काही दिवसात नुपूर आशिषला पुण्यामध्ये बोलवते. आठवड्या भरात आशिष निघतो. ह्या आठवड्यातले बारा तास तो नुपूर सोबत बोलायचा, मेसेज करायचा.


नुपूर: मग कधी आहे फ्लाईट तुमची?


आशिष: उद्या सकाळी पाच वाजताची आहे.


नुपूर: बरर मग आत्ता झोपा. उद्या तुम्हाला लवकर

ऊठायच आहे.


आशिष: हा बरर.


काही वेळाने आशिष झोपून जातो.


आणि तिथे नुपूर तिच्या बाबांना मेसेज करून सांगते कि आशिष उद्या येत आहे ते...


दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडून काही तासात आशिष पुण्यामध्ये पोहोचतो. आशिष नुपूरला शोधत असतो, ती त्याला घेईला येनार असते. अचानक एरर्पोटवर त्याला एक अनओळखी मुलगी गळाभेट देते आशिष हैराण होता हे कोण आहे म्हणून, तो तिला विचारतो,


आशिष: कोन आहात तुम्ही?


मुलगी: आसं काय करताय. मीच आहे नुपूर.


आशिष: काय??


मुलगी: हो...का काय झाल?


आशिष: नाही तुम्ही नुपूर नाही आहात.


मुलगी: अस काय करताय


आशिष तिला खर्या नुपूरचा फोटो दाखवतो. तो जोवर पाहात होता तेव्हा ती खरी नुपूरच दिसत असते आणि जेव्हा आशिष त्या मुलीला दाखवायला तिच्याकडे फोन वळवतो आणि परत पाहतो तर त्या फोन मध्ये त्या समोरच्या मुलीचा फोटो येतो. आत्ता आशिष फार गोंधळला असतो त्याला काही समजत नव्हत. तो तिथून पळून जातो आणि जवळच्या एका हॉटेल मध्ये राहतो. तो घाईत आर्यनला फोन लावतो.


आर्यन: काय भाऊ पोहोचला का?


आशिष: आर्यन खूप मोठा गोंधळ चाललाय यार

ईथे.


आर्यन: म्हणजे?


आशिष: ज्या मुलीवर मी गेले एक वर्ष प्रेम करतोय ती ही नाही.


आर्यन: काय....? आरे... नीट सांग ना.


आशिष आर्यनला आत्ता परंत झालं गेलं सगळ सांगतो.


आर्यन: कुठला फोटो बदलाय मला पाठव बर.


आशिष: हा थांब पाठवतो.


आशिष त्या दुसऱ्या नुपूरचा फोटो आर्यनला पाठवतो. आर्यनचा लगेच आशिषला कॉल येतो.


आर्यन: ए बाबा काय बदललय? आहे की सगळं

बरोबर.


आशिष हैराण होता

आशिष: काय...?


आर्यन: आरे हिच ती जीच्यावर तू प्रेम करतो.

नुपूर.


आशिष: आरे ही माझी नुपूर नाही.


आर्यन: आरे हिच आहे बाळा.


आशिष फोन थेवतो, तेवढयात त्या नुपूरचे १५ कॉल येऊन गेले असतातं आणि मेसेज असतो की "कॉल उचल". आशिष जरा विचारत पडतो शांत होतो तेवढयात त्या नुपूरचा कॉल येतो. आशिष थोडा विचार करतो आणि पटकन फोन उचलतो.


आशिष: का करत आहेस असं?


नुपूर: मी काय केलं. आणि फोन का नव्हते

उचलत?


तिच्या बोलण्या वारून तिला काळजी असल्या सारख जानवत होतं.


आशिष (रडत): माझी नुपूर कुठे आहे?


नुपूर: मग मी कोण आहे! मी नुपूरच आहे ना.


आशिष: नाही नाही...


आशिष बोलता बोलता फोन थेऊन देतो.


त्याच रात्री...


रात्री आशिष नुपूरच्या आठवणीत तिचं स्केच काडतो. वेग-वेगळ्या प्रकारचे. त्या स्केचला बघून तो रडतो. आणि झोपून जातो,


दुसऱ्या दिवशी...


आशिष सकाळी ऊठतो आणि पाहातो की नुपूरचं स्केच त्याच्या बाजूला असतो. त्या स्केचला पाहून त्याला आयडिया येते. तो लगेच आर्यनला फोन लावतो आणि म्हणतो,


आशिष: आर्यन तुला एक स्केचचा फोटो पाठवतो

बघ.


आर्यन: आरे पण कोणाचा आहे.


आशिष: खर्या नुपूरचा.


ते ऐकून आर्यन हैराण होतो. आर्यन फोटो पाहतो आणि परत मेसेज करतो की...


आर्यन: कशावरून ही खरी नुपूर आहे?


आशिष: मला माहिती ना.


मग आर्यन त्याला एक आयडिया देतो,


आर्यन: जर तुला ही नुपूर खरी वाटत असेल आणि

ती दुसरी खोटी, तर पोलीस कंमप्लेंट कर

ना. जर खरी गायब आसेल तर कोणी तरी

रीपोर्ट केली असेल ना.


आशिषला ती आयडिया बरोबर वाटते. तो लगेच पोलिस कंम्पेंट करायला जातो. तो सगळं सांगतो पोलिसांना मग पोलिस म्हणतात दोन दिवसात कळू. आशिष उदास होऊन हॉटेल मध्ये येतो आणि फोन पाहातो तर खूप मिस्ड कॉल आणि एक मेसेज "कॉल उचल". तो ते दुर्लक्ष करतो. मग आशिषला सुचतं, आशिष पोलिसच्या उत्तराची वाट नाही पाहात. तो त्या स्केचचे बरेच झेरॉक्स काडतो आणि रस्तावर लोकांना वटतो, भिंतीवर लावतो आणि दोन दिवस वाट पाहतो, पण कोणाचा काही कॉल येत नाही , मग तो पोलिस स्टेशन मध्ये जातो आणि ईंस्पेक्टरला विचारतो. ते म्हणतात, फार प्रयत्न केला पण ती मुलगी नाही सापडली, आणि तिच्या नावाने पण कोणीच कंमप्लेंट दिली नाही.


आशिष निराश होऊन हॉटेल परत्तो. आत्ता काय कराव त्याला सुचत नसतं. तेवढयात त्याला त्या नुपूरचा कॉल येतो, तो शांतच होतो आणि विचार करतो, "आत्ता जे काही उत्तर पाहिजे ते आत्ता मला ह्या खोट्या नुपूर कडे भेटेल." परत कॉल येतो. आशिष त्या नुपूरला भेटायचं आहे म्हणून सांगतो, ती पण तैयार होते भेटायला. ते दोघे कॕफेत भेटायच म्हणून ठरवतात.


दुसऱ्या दिवशी आशिष नुपूरच स्केच घेऊन कॕफेत जातो.


नुपूर: कुठे आहात तुम्ही? का असे करताय?


आशिष: मी हे सगळं बोलायला नाही आलोय.

मी फक्त ईतकं विचरायला आलोय की

नुपूर कुठे आहे?


नुपूर: ही काय आहे मी समोर...


आशिष तिला खर्या नुपूरच स्केच दाखवतो आणि म्हणतो,


आशिष: ही आहे खरी नुपूर. ही कुठे आहे?


नुपूर: कोण आहे ही? मी नाही ओळखत.


आशिष(चिडुन): तूच कुठे तरी ठेवलय नुपूरला.

सांग लवकर.


समोरची नुपूर शांत होते. आणि आशिष तिथून निघुन जातो...


वैतागून आशिष परत हॉटेल मध्ये येतो आणि बेडवर येऊन झोपतो. तेवढयात त्याला एका म्हतार्या बाईचा कॉल येतो आणि ती म्हणते की "त्या स्केचमधल्या मुलीला मी पाहिलय". आशिषला धक्काचं बसतो तो खूप खूष होतो. आशिष त्या म्हतार्या बाईला विचारतो की कुठे पाहिलं? ती म्हतारी म्हणते, माझ्या घराच्या ईथे. आशिष लगेच तिचा पत्ता घेतो आणि उद्या जायचं म्हणून ठरवतो.


...दुसऱ्या दिवशी...


आशिष ऊठतो, आवरतो आणि निघतो त्या म्हतार्या बाई कडे. तो त्याच्या फोन घेतो आणि पाहतो की १५ मिस्ड कॉल आणि तोच मेसेज "कॉल उचल". आशिष त्या म्हतारीच्या घरी निघतो. कसा बसा ते घर शोधतो. तो पोहोचतो आणि दारात थांबून घराची बेल वाजवतो. बरेच वेळा वाजवतो पण दार कोण उघडत नाही. मग तो दार तोडून आत जायचं ठरवतो. तो दार तोडुन आत जातो आणि पाहतो तर त्या म्हतारीचा खुण झालाय. तेवढयात तिथे पोलिस येतात, आणि त्या म्हतारी जवळ आशिषला पाहुन पोलिस त्याला आटक करतात तो सांगत आसतो, मी काही नाही केलं, ते आधीच झालं होत. पण त्याचं कोणी नाही ऐकत.


काही वेळाने... आशिष जेल मध्ये असतो. त्याला खूप मारलं होतं. अचानक त्याची नजर दारावर पडते आणि तो पाहतो की खोटी नुपूर त्याची बेल करायला येत असते. तो तिच्या डोळ्यांत त्याच्या बद्दल काळजी बघतो, प्रेम बघतो त्याला असे वाटतं की त्याची खरी नुपूर आली.


आत्ता आशिष ठरवतो की, आत्ता ह्याच नुपूर सोबत राहायचं. तो तिच्या सोबत राहायला लागतो, जगु लागतो. म्हणजे जशीकी त्याला खात्री पटली आहे की त्याची नुपूर हीच आहे म्हणून. ते मस्त फिरता, मज्जा मस्ती करतात. अश्यात बरेच दिवस निघुन जातात...


एक दिवशी, नुपूर आणि आशिष घर साफ करत होते. नुपूर ईतर काही बघत होती आणि आशिष कपाटातून फोटो काडत होता. फोटो बाहेर काडता काडता त्याला अचानक खर्या नुपूरचा एक फोटो मिळतो. ते पाहून जसेकी आशिषची याद-दाश परत येते. तो टोड फोड करायला लागतो. अवाज ऐकून नुपूर तिथे पोहोचते आणि आशिष तिला विचारतो, नुपूर कुठे आहे, हा फोटो तुझ्या कडे कसा? कोण आहेस तू ? नुपूर बोलते आशिष ऐकून घे... असं बोलता बोलता आशिषच्या डोक्यात कोण तरी माघून रॉड मारतं आणि आशिष तिथेच बेशुद्ध होतो...


काही वेळाने, आशिषला जाग येते आणि तो स्वताला एक लाल बलबच्या खोलीत बघतो. सगळं लाल लाल, रक्त आणि त्या रंगात काहीच फरक नव्हता. आशिष जरा आजू बाजूला पाहतो, त्याला खर्या नुपूरचे आई वडील दिसतात मरून पडलेले . नुपूरच्या वडिलांच डोकं शरीरा पासून वेगळ करण्यात आलतं. आशिष नुपूरचा विचार करून घाबरतो. अचानक त्याला खोट्या नुपूरचा आवाज येतो, त्याला कळत नाही ते काय बोलतात. आशिष तिथून पळून जायचं म्हणून ठरवतो. तो बांधून आसतो तरी कसा तरी करून तो तिथून निघण्यात कामयाब होतो. आशिष मोकळ्या रस्त्यावर पळत सुटतो, त्याच्या डोळ्यांला मार लागला होता.तो तरी पळत होता, पळता पळता एक गाडी त्याला समोरून येऊन धडकते....


आशिष डचकुन ऊठतो आणि पाहतो की तो रात्री जिथे दारू पैला बसला होता तो तिथेच असतो. मग त्याला कळत ते स्वप्न होतं. पण ती नुपूर कोण होती?, ती कुठे आहे?, ती खोटीवाली कोण होती?. आशे बरेच प्रश्न आशिषच्या डोक्यात फिरत होते. अचानक त्याचा फोन वाजतो आणि त्याचं लक्ष फोन कडे जातं आणि तो पाहतो की ८०-९० मिस्ड कॉल आणि एक मेसेज "कॉल उचल" होता.


17 Avril 2022 14:39:56 0 Rapport Incorporer Suivre l’histoire
0
À suivre… Nouveau chapitre Tous les dimanches.

A propos de l’auteur

Commentez quelque chose

Publier!
Il n’y a aucun commentaire pour le moment. Soyez le premier à donner votre avis!
~